Wednesday , February 8 2023
Breaking News

नेरळ प्रीमियर लीगचे चौथे पर्व रंगणार

कर्जत : बातमीदार

नेरळमधील क्रिकेटपटूंसाठी नेरळ प्रीमियर लीग (एनपीएल)चे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर रंगणार आहे. एनपीएलमध्ये नेरळ डेअर डेव्हील, नेरळ वॉरीअर, नेरळ सुपरकिंग, नेरळ चॅलेंजर्स, नेरळ इंडियन्स, नेरळ लायन्स, नेरळ किंग 11, नेरळ रॉयल, नेरळ सनराईज आणि नेरळ नाईट रायडर्स हे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविली जाणार आहे. मैदानात खेळाडूंसाठी कक्ष, तर प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था असणार आहे. स्पर्धेचे थेट प्रेक्षपण यू ट्यूबवर आणि टेनिस क्रिकेट डॉट कॉमवर केले जाणार आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply