Breaking News

आदिवासी वाड्यांवर मतदार नोंदणीसह आभा कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या माध्यूमातून व ग्रुप ग्रामपंचायत चावणे या अंतर्गत सवणे गाव व सर्व आदिवासी वाड्या चावणे गाव काळवली गाव मधील नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी व आभा कार्ड व नवीन रेशन कार्ड बनविण्याचे शिबिर शनिवारी (दि. 28) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये लाभार्थींना आभा कार्ड व नवीन रेशन कार्ड वाटप करण्यात आले. कासप गावचे चावणे विभागीय माझी अध्यक्ष व माजी सरपंच किरण माळी, चिखलेचे उपसरपंच भानूदास माळी, भाजप कार्यकर्ते भगवान देशमुख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. धनजंय निरगुडा, पूर्वा देशमुख, राजा पवार, चावणे ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाघ, अक्षय देशमुख, सचिन देशमुख राघो देशमुख, मधुकर वाघ, अजय पवार, नरेश वाघ, कृष्णा कोंडीलकर आदी या कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान, या शिबिरामध्ये मतदार नोंदणी 70, आभा कार्ड 20, रेशन नवीन वाटप 14, पेरची वाडी 12 रोशन कार्ड धारकांना आधरकार्ड रेशनी कार्डाला लिंग करण्यात आले.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply