Monday , January 30 2023
Breaking News

हैं तय्यार हम!

श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडशी भिडणार टीम इंडिया

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघासाठी 2019 वर्ष शानदार ठरले. वर्ल्ड कपमधील एका सामन्याचा अपवाद वगळता भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. घरच्या मैदानावर असो की परदेशात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे सिद्ध केले. वर्षाच्या अखेरीसदेखील भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकेत विजय मिळवला.

आता जानेवारी महिन्यात भारतीय संघाला एक-दोन नव्हे तर तीन संघांसोबत सामने खेळायचे आहेत. यात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघांचा समावेश आहे. विराट आणि कंपनीला जानेवारी महिन्यात घरच्या आणि परदेशात मिळून 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

नव्या वर्षात भारताचा पहिला सामना लंकेशी होणार आहे. श्रीलंकेचा संघ तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौर्‍यावर येत आहे. या मालिकेची सुरुवात 5 जानेवारीपासून होत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वन डे मालिकेसाठी भारत दौर्‍यावर येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मलिकेची सुरुवात 14 जानेवारीपासून होत आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौर्‍यावर जात आहे.

श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-20 सामना 5 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. दुसरा सामना 7 जानेवारी रोजी इंदूर येथे, तर तिसरा आणि अखेरचा सामना 10 जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वन डे मालिकेसाठी भारत दौर्‍यावर येणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना 14 जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. दुसरी वन डे राजकोट येथे 17 जानेवारी रोजी, तर तिसरी आणि अखेरची वन डे 19 जानेवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारत पाच टी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply