Monday , June 5 2023
Breaking News

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा; काजल, ओजस, विकास विजेते

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत काजल कुमारी, ओजस जाधव व विकास धारिया यांनी अनुक्रमे महिला, पुरुष आणि कुमार गटात विजेतेपदाला गवसणी घातली. माटुंगा येथील सेंट्रल रेल्वे वेल्फेअर सभागृहात ही स्पर्धा झाली.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडियन ऑइलच्या काजलने जैन इरिगेशनच्या निलम घोडकेचा 25-6, 25-18 असा धुव्वा उडवत अपेक्षित यश संपादन केले. त्यापूर्वीच्या उपांत्य लढतीत काजलने मिताली पिंपळेला 25-3,25-8 अशी सहज धूळ चारली होती; तर नीलमने जान्हवी मोरेला 25-12, 25-0 असे सहज हरवून अंतिम फेरी गाठली होती. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात महापालिकेच्या विकासने वरळी स्पोर्ट्स क्लबच्या फहीम काझीला 25-0, 19-13 असे पराभूत करून जेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत विकासने राहुल सोलंकीला 19-17, 25-0 असे हरवले होते; तर फहीमने अभिषेक भारतीला 18-14, 23-8 असे नमवले होते. कुमार गटात (18 वर्षांखालील) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ओजसने मिहिर शेखला रोमहर्षक अंतिम लढतीत 13-6, 7-12, 22-7 असे हरवून विजेतेपद मिळवले. आता 25 मार्चपासून वाराणसी येथे फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply