उरण : वार्ताहर
तालुक्यातील पिरकोन येथील धोंडूकाका मैदानावर खेळल्या गेलेल्या समर्थ चषक क्रिकेट स्पर्धेत केगाव क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले. कोप्रोली संघ उपविजेता ठरला.
या दोन दिवसीय स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश होता. आमदार महेश बालदी यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. विजेत्या केगाव संघाला 1,01,111 रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या कोप्रोली संघाला 50,555 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
शिक्षक नेते नरेश मोकाशी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गावंड, उपाध्यक्ष बाळकृष्ण गावंड यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या वेळी आयोजक मुकुंद गावंड, भार्गव म्हात्रे, निलेश पाटील, अनिल पाटील, सल्लागार नरेंद्र गावंड, कल्पेश गावंड, गजानन गावंड, मंगेश गावंड, गणेश म्हात्रे, दीनानाथ म्हात्रे, महेश गावंड आदी उपस्थित होते.