Breaking News

सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

हिंदुस्थान टाईम्सतर्फे राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा (नॅशनल क्विझ कॉम्पीटीशन) आयोजित करण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केली होती.

या स्पर्धेत सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथीतील दोन विद्यार्थी आराध्य गुरूनाथ शेळके व रचना एस. वाघमारे यांनी जिल्हास्तरावर तसेच इयत्ता आठवीच्या पूजा मिंलीद नामे या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर यश संपादन केले.

या स्पर्धेत विद्यार्थिनीने तालुका स्तरावर बक्षीस प्राप्त केले. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारीणी मंडळाच्या सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलीमा शिंदे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढीलवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यासोबतच संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल मनपा माजी नगरसेवक अनिल भगत यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून  पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply