Breaking News

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून दुसरे स्थान भक्कम

दुबई : वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत निर्भेळ यश संपादन करणार्‍या ऑस्ट्रेलिया संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेत आपले दुसरे स्थान अधिक भक्कम केले आहे.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेंतर्गत 10 सामने खेळले असून, यापैकी सात सामन्यांत कांगारूंनी विजय मिळवला आहे. त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला असून, दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात सध्या 296 गुण जमा आहेत. टीम इंडिया या स्पर्धेत

सात सामन्यांमध्ये सात विजयांसह 360 गुणांनिशी अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अशाचप्रकारे खेळत राहिल्यास आगामी काळात टीम इंडियाचे अव्वल स्थान धोक्यात येऊ शकते.

आयसीसी कसोटी अजिंक्यपद गुणतक्ता

भारत      :    7 सामने, 7 विजय, 360 गुण

ऑस्ट्रेलिया :    10 सामने, 7 विजय, 296 गुण

पाकिस्तान :    4 सामने, 1 विजय, 80 गुण

श्रीलंका    :    4 सामने, 1 विजय, 80 गुणन्यूझीलंड   :    5 सामने, 1 विजय, 60 गुण

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply