रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू घाटात डम्परवर कार जाऊन आदळली. यामध्ये सत्यनारायण सिंह, मुलगा अजित सिंह, जावई मंटू सिंह आणि सुबोध सिंह, गाडीचे चालक विजय हे ठार झाले आहेत; तर कुटुंबातील दोन महिला आणि तीन मुलांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …