Breaking News

महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना नारीशक्ती पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशभरातील 44 माहिलांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील कमांडो प्रशिक्षक सीमा राव, ‘तंतुवी’ संस्थेच्या स्मृती मोरारका, उद्योजिका कल्पना सरोज, कथ्थक नृत्यांगना सीमा मेहता, नगर जिल्ह्यातील ‘बीज माता’ (सिड मदर) राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्यातील माणदेशी महिला सहकारी बँकेच्या चेतना गाला सिन्हा यांना सन्मानित करण्यात आले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply