Sunday , February 5 2023
Breaking News

महिलांसाठी आज हेल्मेट बाइक रॅली

पनवेल : कलंबोळी वाहतूक शाखा येथे सर्व महिलांसाठी हेल्मेट बाइक रॅलीचे आयोजन गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. अधिकाधिक महिलांनी बाइक रॅलीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन कळंबोली वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी केले आहे. तसेच सहभागी महिलांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वाहतूक विभागाचा रस्ता सुरक्षा अभियान-2020 कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच झाला. यानंतर कळंबोली वाहतूक शाखेतर्फे महिला दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून सांगत बाइक रॅलीमध्ये सामावून घेऊन त्यांच्यामार्फत नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व समजावण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेमार्फत करण्यात येणार आहे.  बाइक रॅलीमध्ये स्त्री शक्ती फाऊंडेशन, अस्मिता सामाजिक संस्था, दिशा फाऊंडेशन, मराठा समाज, जिजाऊ फाऊंडेशन, महिला बालविकास नवी मुंबई तसेच सर्व स्थानिक शाळेतील महिला शिक्षिका सहभागी होणार आहेत.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply