Breaking News

उरणच्या फुंडे हायस्कूलमध्ये मकरसंक्रांतीचा सण उत्साहात

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथे बुधवारी (दि. 15) मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

‘सण संक्रांतीचा मोठा, नाही आनंदाला तोटा,’ असा हा आनंददायी उत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ‘अ’च्या वर्गाने हा कार्यक्रम सादर केला. सकाळी शालेय परिपाठानंतर विद्यालयाचे प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षिका आशा मांडवकर आणि सर्व शिक्षक भगिनींच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मकरसंक्रांत सणाविषयी खूप छान माहिती दिली. ज्येष्ठ शिक्षिका के. जी. म्हात्रे

यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मकरसंक्रांतीचे वैज्ञानिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आशा मांडवकर यांनी विद्यार्थ्यांना या सणाचे महत्त्व समजावत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना तिळगूळ वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनीदेखील गुरुजनांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे निवेदन पाचवी ‘अ’च्या वर्गशिक्षिका सी. ए. घरत यांनी केले, तर आभार एस. डी. म्हात्रे यांनी मानले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply