Breaking News

रायगडचे कबड्डी संघ जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ जाहीर करण्यात आले आहेत. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे होणार आहे.

उरणमधील बोकडवीरात झालेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून रायगडचे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले. पुरुष संघाचे सराव शिबिर पेझारी, तर महिला संघाचे उरण येथे सुरू आहे. दोन्ही संघ कसून सराव करीत आहेत. लवकरच पेझारी येथून दोन्ही संघ चिपळूणला रवाना होतील, अशी महिती रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

पुरुष संघ : बिपीन थळे, संकेत बानकर, मितेश पाटील, मयूर कदम, गौरव पाटील, मिथून मोकल, राज पाटील, दीपक कासारे, अजय मोरे, प्रतीक धुमाळ, विकास जोगडे, चेतन पाटील.

प्रशिक्षक : संदेश बैकर, व्यवस्थापक : मनोज पाटील

महिला संघ : मंदाकिनी पाटील, ज्योती रावत, धनश्री बेंद्रे, सिध्दी नाखवा, तेजा सकपाळ, रश्मी पाटील, प्रांजली  पाटील, दीप्ती साळावकर, ॠतुजा पाटील, वैशाली पाटील, कोमल पेडवी. प्रशिक्षक : भारत पाटील, व्यवस्थापिका : सुनंदा गावंड

Check Also

यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा

यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …

Leave a Reply