Monday , January 30 2023
Breaking News

रस्ते सुरक्षा अभियानादरम्यान अपघातांची मालिका

आराम बसची इको कारला धडक

द्रुतगती महामार्गावरील अपघातात एक ठार, मायलेकी जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या इको कारला शुक्रवारी (दि. 17) सकाळी भरधाव आराम बसने पाठिमागून धडक दिली. या अपघातत एक ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आई व मुलगी यांचा समावेश आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्याकडे चाललेली इको कार (एमएच-01, एएम-7218) शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर हद्दीत शोल्डर लेनवर उभी होती. त्याचवेळी पाठिमागून आलेली आराम बस (एमएच-48,के-1818) ने इको कारला धडक दिली. त्यामुळे बँरिगेटस व बस यांच्यामध्ये अडकून कार पलटी झाली. या अपघातात कारमधील दिनेश साळेकर (वय 42, रा. सायन कोळीवाडा) हे जागीच ठार झाले. तर पुनम साळेकर (वय 27, रा. नेरुळ), आणि लता साळेकर (वय 49, रा. सायन कोळीवाडा) या मायलेकी जखमी झाल्या. अपघातानंतर आराम बसमधील चालक व प्रवासी घटना स्थळावरुन पसार झाले.

चालत्या बसमधून पडल्याने प्रवासी गंभीर जखमी

खालापूर : प्रतिनिधी

चालत्या एसटी बसच्या दरवाजातून पडल्यामुळे शत्रुघ्न नाईक (रा. कसळखंड, ता. पनवेल) हा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई – पयणे जुन्या महामार्गावर घडली असून शत्रुघ्नला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खोपोली ते पनवेल जाणार्‍या एसटी बसमधून शत्रुघ्न प्रवास करित होता. बस खालापूर हद्दीतून जात असताना महड गावाच्या हद्दीत आली असता, दरवाजात उभ्या असलेल्या शत्रुघ्नचा तोल जावून तो रस्त्यावर पडला. त्यात त्याच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला. त्याला तातडीने कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बस चालक सिंकदर इब्राहीम तडवी खान पठाण(रा. भिसेगाव, ता. कर्जत) याने अपघाताची माहिती खालापूर पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस हवालदार सुभाष म्हात्रे करीत आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply