Breaking News

शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी

350 रुपयांत 20 भाज्यांचे किट; ग्राहकांची पसंती

माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील पनवेल व खारघर या शहरी भागातील नागरिकांसाठी शेतकर्‍यांनी एक अभिनव कल्पना साकारली असून शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट ग्राहकांना घरपोच दिला जाणार आहे.
यामध्ये एकूण 20 विविध प्रकारच्या पालेभाज्या अतिशय स्वस्त दरात 350 रुपयांत ग्राहकांना मिळणार आहेत. लॉकडाऊनमुळे शेतकरी व ग्राहक थेट विक्रीचा हा उपक्रम शेतकर्‍यांना व ग्राहकांना अत्यंत उपयुक्त ठरत असून शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट ग्राहकांना मिळत आहे. या किटमध्ये 20 भाज्या आहेत. यामध्ये एक किलो काकडी, एक किलो शिमला मिरची, एक किलो टोमॅटो, 500 ग्रॅम भेंडी, 250 ग्रॅम हिरवी मिरची, 500 ग्रॅम दोडका, 500 ग्रॅम वांगी, दोन जुडी कोथिंबीर, 250 ग्रॅम आले,  एक किलो बटाटा, एक नग फ्लॉवर, दोन नग कोबी, 500 ग्रॅम गाजर, 500 ग्रॅम शेवगा, 500 ग्रॅम कारले, 250 ग्रॅम गवार, 1.5 किलो कांदे, 10 नग लिंबू, एक नग कलिंगड, एक नग खरबूज यांचा समावेश आहे. खास सोसायट्यांच्या पूर्वनोंदणीने सदर भाजीपाला किट पोहच केले जात आहेत.
शेतकरी आज वाईट परिस्थितीतून जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात भाजीपाल्याअभावी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त 350 रुपयांत ग्राहकांच्या दारात सेवा देत आहे. सर्व सोसायटी मिळून बुकिंग झाल्यास चांगल्या प्रकारे सेवा देता येते. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply