नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नईत होणारे दोन्ही कसोटी सामने मात्र प्रेक्षकांविना होणार आहेत.
एका रिपोर्ट्सनुसार अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणार्या मालिकेतील तिसर्या कसोटी सामन्यापासून प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामने पाहता येण्याची शक्यता आहे, पण किती टक्के दर्शकसंख्या उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांचे मनोबल उंचावलेले आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात लोळवले, तर इंग्लंड संघाने श्रीलंकेचा त्यांच्याच भूमीत पराभव केला. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी उभय संघ चेन्नईमध्ये पोहचले असून, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करीत आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper