Breaking News

रात्रीस खेळ चाले…

एखाद्या शहरात ‘नाइट लाइफ’  सुरळीत चालावयाचे असेल तर तेथील नागरी सुविधा अत्यंत चोख असाव्या लागतात. अशा नागरी व्यवस्था मुंबईत अस्तित्वात आहेत का हा खरा प्रश्न आहे. 2008साली 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला अजूनही कोणी विसरू शकलेले नाही. रात्री-अपरात्री स्त्रिया एकट्या-दुकट्या प्रवास करू शकतील अशीही परिस्थिती इथे नाही. अशा अभावाच्या काळात ‘नाइट लाइफ’ची चैन परवडणारी नाही. म्हणूनच ही घोषणा पोकळ ठरते.

राजकारणाचे कुटिल डावपेच लढवून मागल्या दाराने सत्ता काबीज केल्यानंतर कारभार करणे किती जड जाते याचे प्रत्यंतर

महाराष्ट्रातील मतदारांना गेल्या पन्नास दिवसांत आले असेल. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या स्पष्ट जनादेशाला केराची टोपली दाखवून तीन पक्षांचे खिचडी सरकार अस्तित्वात आले, त्याला रविवारी पन्नास दिवस पूर्ण झाले. या दीड महिन्याच्या काळात देखावेबाजी, पोकळ घोषणा आणि भूलथापांपलिकडे हाती काहीही लागलेले नाही. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची आकर्षक घोषणा नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी करण्यात आली. त्यादिशेने किंचित देखील हालचाल झालेली नाही. देखावेबाजीचा कळस म्हणून आणखी एका आकर्षक घोषणेकडे बोट दाखवता येईल. ती घोषणा म्हणजे मुंबईच्या ‘नाइट लाइफ’बद्दलची. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील ठराविक भागात प्रायोगिक तत्त्वावर या ‘नाइट लाइफ’ची सुरूवात होईल अशी घोषणा वाजतगाजत करण्यात आली. महाराष्ट्राचे नव्या नवलाईचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा करून टाकली खरी. परंतु 24 तास उलटायच्या आतच ही योजना येत्या 26 तारखेपासून अंमलात आणणे अशक्य असल्याचा निर्वाळा त्यांच्याच सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देऊन टाकला. मुंबईचे ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याची ही योजना आदित्य ठाकरे यांची फार लाडकी संकल्पना आहे. थोडीथोडकी नव्हे गेली सहा-सात वर्षे ते आपली योजना मांडत आहेत. वास्तविक पाहता या योजनेत टीका करण्यासारखे फारसे काही नाही. जगातील अनेक आंतराराष्ट्रीय शहरांमध्ये ‘नाइट लाइफ’ची संस्कृती गेली अनेक वर्षे प्रचलित आहे. शिकागो, न्यूयॉर्क, म्युनिक, पॅरिस, बँकॉक, सिंगापूर अशा अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रात्र-जीवन फार उत्साहाने साजरे केले जाते. पॅरिससारखे शहर तर त्यासाठी प्रसिद्धच आहे. या शहरातील मध्यवर्ती भाग किंवा एखादे प्रमुख उपनगर रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून जाते. मद्याचे चषक भरभरून वाहतात. पावलोपावली असलेल्या नृत्यगृहांमध्ये तरुणाई रात्रभर ठेका धरते. या रात्र जीवनामुळे त्या-त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. पर्यटकांचे थवे अशा ठिकाणी आवर्जून भेट देतात. मुंबई हे जगातील महत्त्वाचे शहर असले तरी रात्र-जीवनाचे अंग मुंबईला नाही. मुंबईतील रात्र-जीवन हे बव्हंशी बेकायदा व लपूनछपून चाललेले असते. नव्या योजनेनुसार दक्षिण मुंबईतील काही निवडक मॉल्स, उपाहार गृहे, हॉटेले आणि दुकाने रात्रभर उघडी राहतील. त्यायोगे मुंबईच्या रात्र-जीवनाला नवी ओळख मिळेल व व्यापार उदीम वाढून अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागेल असा पर्यटन मंत्र्यांचा दावा आहे. इतकेच नव्हे तर या योजनेमुुळे पंधरा लाख नवे रोजगार निर्माण होतील असेही सांगितले जाते. हे आकडे काहिसे फुगवलेले वाटले तरी थोडाफार फरक पडेल यात शंकाच नाही.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply