पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्र.18चे नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र.18 मधील विकासकामे जोरदारपणे सुरू आहेत. प्रभाग क्र.18 मधील बिरमोळे हॉस्पिटल ते वरद विनायक सोसायटी परिसर याठिकाणी असलेली रस्त्याची कामे, तसेच गटारे, नाल्याची कामे जी पूर्वीच मंजूर करून घेतली होती ती आता जोरदारपणे सुरू झाली असून त्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेऊन नगरसेवक पाटील यांनी पाहणी केली. तसेच कामासंदर्भात आवश्यक सूचना संबंधित कंत्राटदाराला करून सुधारीत कामे त्याच्याकडून करून घेतली. पहिल्या काही दिवसांतच या प्रभागातील बहुतांश कामे पूर्ण झालेली दिसून येणार आहेत.