Breaking News

माणगाव असोसिएशनची क्रिकेट स्पर्धा उत्साहात

माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई माणगाव संघाने अंतिम सामन्यात नाणोरे संघावर मात करीत सलग दुसर्‍यांदा अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार  रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यंगस्टार उतेखोल माणगावतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. माणगाव शासकीय विश्रामगृहासमोरील मैदानावर रविवारी (दि. 2) स्पर्धा उत्साहात पार पडली.
स्पर्धेतील उपविजेत्या नाणोरे क्रिकेट संघाला सात हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते एव्हरग्रीन लोणशी मोहल्ला संघास पाच हजार रुपये व आकर्षक चषक व चतुर्थ क्रमांकाचे विजेते दत्तनगर माणगाव संघास तीन हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून नाणोरे क्रिकेट संघाचा खेळाडू गोकुळ राजेशिर्के, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून फ्रेंड्स ग्रुप साई संघाचा खेळाडू अबुझर दळवी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून फ्रेंड्स ग्रुप साई संघाचा खेळाडू माझ कोंडविलकर, तर मालिकावीराचा बहुमान फ्रेंड्स ग्रुप साई संघाचा अष्टपैलू  खेळाडू मुज्जमील खेरटकर यांनी पटकावला.
या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, माणगावचे माजी उपसरपंच अनंता थळकर, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे चिन्मय मोने, प्रदीप लांगे, घनश्याम शेठ, असोसिएशनचे अध्यक्ष नागेश रातवडकर, उपाध्यक्ष फहद करबेलकर यांसह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply