Breaking News

स्वामीनारायण इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी करिअरसाठी अम्बिशन डे

मोहोपाडा : प्रतिनिधी : कोणते करिअर निवडायचे किंवा त्यात पुढे कसा निभाव लागेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांना भेडसावत असतात. आपल्याला पुढे नेमके काय करायचे आहे, आपले ध्येय काय आहे व त्यानुसार कोणते करिअर निवडणे योग्य ठरेल, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. यासाठीच चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये अम्बिशन डे साजरा करण्यात आला.

या मध्ये सर्व विद्यार्थी आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करीयर करायचे आहे त्याचा वेष परिधान करून आले त्या मध्ये डॉक्टर, संशोधक, पोलीस, अभियांत्रिकी, उद्योगपती, शिक्षक, वकील असा वेष परिधान करून आले होते. सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या आवडीच्या क्षेत्रानुसार गट करून त्या त्या क्षेत्रातील तज्ञ् व्यक्तींनी व त्या क्षेत्रामध्ये पुढे कोणकोणत्या संधी आहेत. याविषयी अधिकाधिक माहिती कशी मिळवायची याविषयी  याविषयी मार्गदर्शन केले. 

डॉ. जुनेदअख्तर शेख, डॉ. अब्रार शेख, डॉ. नचिकेत पाटील या प्रतिष्ठीत डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रातील करियर विषयी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संचालक मनोहर, मुख्याध्यापक जॉन्सन, संचालक पूज्य योगेश्वर स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply