पनवेल ः बातमीदार : रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्यु. कॉलेज वावंजे, ता. पनवेल येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ उत्साहात साजरा झाला. विद्यालयाचे चेअरमन जी. आर. पाटील यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात केली. जी. आर. पाटील यांनी मनोगतात सांगितले की, विद्यालयाच्या जडणघडणीमुळे ज्युनिअर कॉलेजची निर्मिती झाली आहे. त्यासोबत त्यांनी ज्युनिअर कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना यशस्वी कसे व्हावे याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी ज्यु. कॉलेजचे चेअरमन पंकज पाटील, व्हाईस चेअरमन अब्दुल्लाही शेख यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रा. हेमंत धायगुडे यांनी प्रास्ताविकात ज्युनिअर कॉलेजमध्ये राबविण्यात येणार्या पर्यावरण व रस्ते सुरक्षा व्यवस्था अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्यु. कॉलेजचे व्हाईस चेअरमन अब्दुल्लाही शेख यांनी बारावीनंतरच्या विविध संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी तथा प्राचार्य एस. एस. फडतरे यांनी विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन करून बोर्ड
परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.