Breaking News

हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

उरण : वार्ताहर : भारतीय जनता पक्षाकडून शनिवारी (दि. 15) दुपारी 3 वाजता पिरकोन येथील श्री एकवीरा देवी मंदिर, देना बँकेजवळ हळदी-कुंकू समारंभ (महिला सक्षमीकरण)  आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नीता महेश बालदी यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू समारंभ झाला. कार्यक्रमाचे आयोजक मुकुंद गावंड, भार्गव म्हात्रे, नरेंद्र गावंड, कमलाकर गावंड, गजानन गावंड, श्री गणेश महिला मंडळ बचत गट, भाजप पिरकोन, महिला भगिनी पिरकोन, श्री गणेश महिला मंडळ बचत गट अध्यक्ष लक्ष्मी गावंड, सचिव बिंदू गावंड, खजिनदार शिल्पा गावंड आदी होते.

कार्यक्रमास नीता बालदी यांसह उरण पंचायत समिती सदस्या दिशा पाटील, भाजप तालुका महिला अध्यक्षा संगीता पाटील, शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, नगरसेविका जान्हवी पंडित, भाजप तालुका महिला सरचिटणीस राणी सूरज म्हात्रे, चिटणीस सुरक्षा जोशी, कळंबुसरे सरपंच नूतन नाईक, सरपंच खोपटे विशाखा प्रशांत ठाकूर, रेखा म्हात्रे, भाजप कोप्रोली गाव अध्यक्षा निशा म्हात्रे, पिरकोन गाव अध्यक्षा सुजाता गावंड, कोप्रोली सरपंच अलका म्हात्रे तसेच पिरकोन, पुनाडे, वशेणी, सारडे, नवीन शेवा, कळंबुसरे, खोपटे, पाले, पाणदिवे, मोठी जुई, आवरे आदी ठिकाणाहून महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply