Breaking News

अपघातग्रस्तांना मदत करणार्या खोपोलीतील भक्ती साठेलकरचा सत्कार

खोपोली ः प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर नित्याने अपघात होत असतात. त्या अपघातांमधील जखमींना वेळीच तातडीची उपचाराची गरज असते. त्यासाठी खोपोलीत अपघातग्रस्तांच्या मदतीने हा सोशल ग्रुप  अनेक वर्षांपासून काम करीत आहे, या ग्रुपमधील एक महिला भक्ती साठेलकरही इतर कार्यकर्त्यांसोबत रात्री-अपरात्री अपघातग्रस्तांना मदत करीत असते. तिचा राज्य शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांना शनिवारी (दि. 26) वाशी येथील विष्णूदास भावे सभागृहात सन्मानित करण्यात आले. या वेळी खोपोलीतील भक्ती साठेलकरच्या सेवाभावी कार्याची दखल घेत तिचाही सन्मान करण्यात आला.

भक्ती ही अपघातग्रस्त मदत टीमचे प्रमुख गुरुनाथ साठीलकर यांची कन्या आहे. लहानपणापासून सामाजिक कार्याचा वसा तिने आपल्या वडिलांपासून घेतला आहे. तिच्या सन्मानाच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत तिच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका

संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची ‌‘लक्षवेधी‌’ पनवेल : रामप्रहर वृत्तउरणमधील ऐतिहासिक आणि …

Leave a Reply