पनवेल ः वार्ताहर : पनवेल आरटीओसमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सेलेरिओ गाडीला अचानकपणे आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 17) घडली. यात गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पनवेल आरटीओ कार्यालयासमोरच गाडी पार्किंगसाठी स्टील मार्केटकडून जागा देण्यात आली आहे. दररोज पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरटीओ कार्यालयात आपल्या वाहनांची कामे करण्यासाठी येतात. तेव्हा या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली जाते. सोमवारी साडेबाराच्या सुमारास सीएनजी गॅस फिटिंग असलेल्या विश्वास उलवेकर यांच्या सेलेरिओ गाडीला (क्र. एमएच-46-बीके-7094) आग लागली. आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीमुळे बाजूची स्कॉर्पिओ गाडीही अर्धवट जळाली. वेळीच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने येथील इतर गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचल्या. आरटीओनेही जमा केलेल्या गाड्या याच पार्किंगमध्ये ठेवल्या आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper