माणगाव : प्रतिनिधी
लहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत माणगाव क्रिकेट असोसिएशन संघाने अंतिम सामन्यात ए वन निजामपूर संघावर दणदणीत मात करीत विजेतेपद पटकाविले. राहुल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.
अंतिम सामन्यात माणगाव संघाने निर्धारित तीन षटकांत तब्बल 48 धाव पटकावला. हे आव्हान निजामपूर संघाला पेलवले नाही. तृतीय क्रमांक साई क्रिकेट हर्णे दापोली, तर चतुर्थ क्रमांक न्यू चॅम्पियन बॉईज तळेगाव संघाने मिळविले. सर्व संघांना रोख रक्कम व चषक देण्यात आले. मालिकावीर समीर परदेशी (निजामपूर), उत्कृष्ट फलंदाज म्हणून वलिद बंदरकर, उत्कृष्ट गोलंदाज सागर जोरकर, अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून संयोग टेंबे (सर्व माणगाव) यांची निवड करण्यात आली. त्यांनाही आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या उदघाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी नगरसेवक सचिन बोंबले, मजिद हाजिते, अजेश नाडकर, अरुण बक्कम, दिलीप बक्कम, योगेश बक्कम, अजय तेटगुरे, जितेंद्र तेटगुरे, नंदू वाढवल, अनंत सकपाळ,बाळाराम बक्कम, देवदास भोनकर, उपसरपंच स्वप्नील सकपाळ आदी उपस्थित होते.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …