Breaking News

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा;  सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

लंडन : वृत्तसंस्था
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने तिच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धुसर झाल्या आहेत, तर लक्ष्य सेनचेही आव्हान संपुष्टात आले आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने 49 मिनिटे लांबलेल्या या सामन्यात ह्युनवर 21-19, 21-15 असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीने सायनाला अवघ्या 28 मिनिटांत 21-11, 21-8 अशी दोन गेममध्ये धूळ चारली.
पुरुष एकेरीतील 45 मिनिटे रंगलेल्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनने 18 वर्षीय लक्ष्यला 21-17, 21-18 असे पराभूत केले. लक्ष्यच्या पराभवामुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान समाप्त झाले आहे. पारुपल्ली कश्यपला पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. कश्यपने माघार घेतली, तर किदम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणीत यांना पहिल्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply