कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील दहिवली येथील अशोक मिस्त्री वस्तीतील 60 कुटूंबाना कोरडा शिधा भाजप कर्जत यांचे वतीने वाटप करण्यात आला. यासाठी रोटरी क्लब कर्जत आणि बोहोरा समाज कर्जत यांचे सहकार्य लाभले असून पेट्रोल पंप येथील आदिवासी वस्ती येथील लोकांना सुद्धा शिधा वाटप करण्यात आला. या वेळी सूनिल गोगटे, वसंतराव भोईर, अशोक ओसवाल, कल्पना दास्ताने, विशाखा जिनगरे, प्रकाश पालकर, मंदार मेहेंदळे, स्नेहा गोगटे, सरस्वती चौधरी, विजय जिनगरे, संजीव दातार, सर्वेश गोगटे, समीर घरलुटे, गुलाब मिस्त्री आदी कार्यकर्ते उपस्थित होते.