Breaking News

मुरूडमध्ये गुन्ह्यांच्या नोंदी शून्यावर

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रसार वाढल्याने मुरूड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी शून्यावर आली असली तरी कोरोनामुळे पोलिसांचा ताण जास्तच वाढत चालला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे चोरी करणारे चोर गायब झालेले पाहावयास मिळत आहे. प्रत्येक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातील व्यक्तीला बाहेर जाण्यास मज्जाव करीत असल्याने रस्त्यावरची गर्दी ओसरली आहे. सर्व घरातच असल्याने चोरीचे प्रमाण शून्यावर आले आहे. त्याचप्रमाणे शेजार्‍यांच्या आपापसातील वादाच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना इफेक्ट गुन्हेगारी कमी करण्यास उपयुक्त ठरला आहे. मुरूड पोलीस ठाण्यात घरगुती भांडण, मोबाइल चोरी, हाणामारी, मौल्यवान वस्तूंची चोरी, फसवणूक, विनयभंग यांसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद होते. यामध्ये सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना असतात, मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्याने मुरूडमधील सर्वच दुकाने बंद झाली. परिणामी गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे चोर गायब झाले. ज्या दिवसापासून लोकल बंद झाल्या त्या दिवसापासून गुन्ह्याच्या नोंदी शून्यावर आल्या आहेत, अशी माहिती मुरूड पोलीस ठाण्यातून मिळत आहे.  दरम्यान, लोक जागरूक झाले असून पुणे, मुंबई अथवा परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती पोलिसांना देऊन त्यांच्या तपासणीची मागणी करीत आहेत. त्याचप्रमाणे आपले नातेवाईक मुंबई अथवा अन्य ठिकाणावरून गावात परत आणण्यासाठी पोलीस ठाण्याशी संपर्क करताना दिसत आहेत.

विनाकारण फिरणार्‍यांवर उरण पोलिसांची कारवाई

उरण : वार्ताहर

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाचे अनुषंगाने लोकांची सुरक्षितता धोक्यात आणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांचे कोरोना 2020 सूचना आदेश देऊन सुद्धा शासकीय आदेशाचा भंग करून उरण नगरपालिकेच्या नागरी हद्दीत विनाकारण फिरत असताना व्यक्ती आढळून आल्या त्यांच्यावर उरण पोलिसांनी बुधवारी (दि. 1) कारवाई केली आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र मधुकर जोशी (20 रा. बोरी), भूपेंद्र श्यामबिहारी शुक्ला (23 रा. नागाव), भालचंद्र अनंत पंडीत (48 रा. कोटनाका), गणेश मोतीराम राठोड (36 रा. टाऊनशिप) किशोर शिवशरण बनसोड (24 रा. मोरा) आदी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उरण पोलिसांनी दिली.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply