पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रविवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची हाक देण्यात आली.
हे वृक्षारोपण संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी आकाश पाटील, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक गणेश जगताप आदी उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपण केले असून राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमाचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले आहे.