कळंबोली : प्रतिनिधी – सामाजिक दायित्व या भावनेतून ठेवून खांदा कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाने यंदा जयत्ती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला व परिसरातील आदिवासींना आज अन्नदाना साठी मदतनिधी उपलब्ध करून दिला.
कोरोनाने आलेल्या वाईट परिस्थितीत या सामाजिक संस्थेने येणार्या आर्थिक वर्षात आदिवासींच्या मूलाच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या या सामाजिक दायित्वचा विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. मंडळातर्फे अन्नदान निधी देताना मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे सचिव महेंद्र कांबळे खजिनदार संदिप भालेराव कार्यकारिणी सदस्य प्रवीण जठार आदी उपस्थित होते.