Breaking News

नगरसेवक भोपींच्या पाठपुराव्याने पथरस्त्यांचे काम

खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त

सेक्टर 8मधील नागरिकांच्या तक्रारीनुसार नगरसेवक संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून पथरस्त्यांचे काम मंजूर करून घेतले आणि मंगळवारी (दि. 5) प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर नगरसेवक संजय भोपी, महानगरपालिका स्थायी समिती सदस्या सीताताई पाटील, भाजपा पनवेल शहर  उपाध्यक्ष भीमराव पोवार, सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सोसायटीचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी नगरसेवक संजय भोपी तसेच सर्व नगरसेवकांचे आभार मानले. पनवेल महानगरपालिका खांदा कॉलनी प्रभाग क्र. 15चे नगरसेवक संजय भोपी यांनी वेळोवेळी याबाबत सिडकोकडे पाठपुरावा तसेच पत्रव्यवहार केला. खांदा कॉलनीतील सेक्टर 8मधील प्रभुकुंज, गजानन, त्रिमूर्ती आदी सोसायटींच्या बाहेरील पथरस्त्यांवर ड्रेनेजचे कव्हर तुटलेल्या अवस्थेत तसेच मोठमोठे खड्डे पडून दुरवस्थेमुळे भरपूर वेळा वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुले पथरस्त्यांवरून चालताना खड्ड्यात पडून अपघात होत होते. त्याची दखल घेत भोपी यांनी तातडीने ही कार्यवाही केली.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply