Breaking News

भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नवनाथ नगर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार नवनाथ नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे नगरसेवक अजय बहिरा, राजू बगाटे, अब्दुल आलम, जरीना शेख आदी उपस्थित होते.

कळंबोली, रोडपाली

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या स्वखर्चातून कळंबोलीतील सेक्टर 12,14, 15, 16, आणि रोडपाली आदिवासीवाडी येथील 230 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.

पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महापालिका सभापती तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी, आनंद भुजबळ, विजय भुजबळ, समीर मोरे, साहिल मोरे, गणेश कावळे आदी कार्यकर्त्यांनी गरजूंना धान्याचे वाटप केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply