Breaking News

श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिकांना मनस्ताप

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अर्ध्या ते एक तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येतो. दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना घरात बसणे अशक्य होत आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बहुतांश कारखाने, कंपन्या बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणीही कमी झाली आहे, परंतु श्रीवर्धन येथे वीजपुरवठा खंडित होण्यामागचे कारण काय, असा प्रश्न  नागरिकांना पडला आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

श्रीवर्धन सबस्टेशनमधील ब्रेकर खराब झाला असून, तो दुरुस्त करण्यासाठी पनवेल येथून माणूस येणे अपेक्षित आहे. तो माणूस आणण्यासाठी तहसीलदारांची परवानगी मिळाल्यानंतर ब्रेकर दुरुस्त करण्यात येईल व वीजपुरवठा सुरळीत होईल.

– श्री. खांडेकर, कार्यकारी अभियंता, गोरेगाव महावितरण

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply