पेण ः प्रतिनिधी
पेण तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग अंतर्गत तालुका क्रीडा संकुल पेण आयोजित उन्हाळा सुटीतील शिबिरात पाच दिवसीय थांग-ता मार्शल आर्ट प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा थांग-ता असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र म्हात्रे तसेच थांग-ता राष्ट्रीय पदकप्राप्त जान्हवी वनगे, रविना म्हात्रे, प्राजक्ता तेटमे, विनायक पाटील, प्रथमेश मोकल यांच्या उपस्थितीत थांग-ता मार्शल आर्ट प्रशिक्षणास सुरुवात झाली. यामध्ये पेण मधील मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …