खोपोली ़: प्रतिनिधी
मागील दोन महिन्यांपासून खोपोलीतील टोईंग यंत्रणा बंद होती.त्याबाबतचे वृत्त दै. ‘रामप्रहर‘ मध्ये प्रसिध्द होताच सोमवार (दि. 10) पासून ही टोईंग यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
खोपोली बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी नियमबाह्य वाहने पार्किंग करण्यावर नियंत्रण ठेवणे व कारवाई करण्यासाठी खोपोली नगरपालिका व पोलीस ठाणे यांच्या संयुक्तपणातून शहरात टोईंग यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली होती. मात्र दोन महिन्यांपासून ही यंत्रणा अचानक बंद झाल्याने सर्व ठिकाणी नियमबाह्य वाहने पार्किंग सुरू झाली होती. त्यामुळे बाजारपेठेत सतत वाहतूक कोंडी होत होती. त्याबाबतचे वृत्त शनिवारी (दि. 8) दै. ‘रामप्रहर‘ मध्ये प्रसिध्द झाले होते. त्याची दखल घेत खोपोली पोलिसांच्या प्रयत्नाने टोईंग यंत्रणा सोमवार (दि. 10) पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे खोपोली शहरात नियमबाह्य वाहने पार्किंग करणा़र्यांवर नियंत्रण येणार आहे .