Breaking News

‘टाटा स्टील’कडून खोपोलीत मदत

खोपोली : प्रतिनिधी – आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील कोविड-19चा प्रभाव भारतातील छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही पसरत आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील टाटा स्टील बीएसएल प्लांटच्या हौसिंग कॉलनीतील स्वयंसेवक आजूबाजूच्या स्थानिक समुदायातील गरीब आणि स्थलांतरित कामगारांच्या अत्यावश्यक गरजापूर्ण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

कंपनीच्या हौसिंग कॉलनीतील क्रिएटिव्ह सोल्स लेडीज क्लबच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेले, रेशन कार्ड नसलेले स्थलांतरित कामगार आणि आदिवासी कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप केले आहे. स्थानिक प्रशासन आणि दोन ग्रामपंचायतींनी या दिशेने आधीच सुरू केलेल्या मदतकार्याला हातभार लावणे हा यामागचा उद्देश आहे.

कंपनीच्या प्लांटच्या जवळ असलेल्या बीड जांभरूंग वस्तीतील जवळपास 150 आदिवासी कुटुंबांना धान्य देण्यात आले आहे. याशिवाय प्लांटमधील स्वयंसेवकांनी आतापर्यंत जवळपास 2600 मास्कचेदेखील वाटप केले आहे. हे मास्क्स क्लबच्या 22 सदस्यांनी तयार केले आहेत. या मदतकार्याबरोबरच आशा, एएनएम आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी खालापूरच्या तहसीलदारांकडे मास्क सुपूर्द करण्यात आले आहेत.  खालापूर तालुक्यातील देवन्हावे ग्रामपंचायतीच्या चार स्वयंसहायता गटांना टाटा स्टील बीएसएल कंपनीच्या सीएसआर विभागाने मास्क बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार मास्क बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. या गटांनी याआधीच 1100 मास्क वितरित केले आहेत.

महिला सक्षमीकरण आणि उद्यमशीलतेसाठी समन्वयाचे कार्य करणार्‍या कंपनीच्या सीएसआर टीमच्या स्थानिक मदतनीस किंवा महिला प्रवर्तकदेखील स्थानिक ग्रामपंचायतींना दररोजच्या धान्य वितरणामध्ये मदत करीत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply