महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एका डंपरवर गुरुवारी (दि. 18) संध्याकाळी एक कार आदळली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले.
महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. तेथे सिमेंटने भरलेला डंपर (एमएच-46,बीएफ-1551) उभा होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणार्या स्विफ्ट कार (एमएच-06,बीडब्लू-0096) ने डंपरला धडक दिली. या अपघातात कारमधील नागेश महाडीक (रा. खर्डी) आणि संजय काटकर (रा. ठाणे) हे दोघे गंभीर जखमी झाले. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.