Breaking News

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांचा मार्ग मोकळा

रायगड इ-पासची जिल्हा प्रशासनाकडून सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार रायगड इ-पासची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातून परराज्यात जाऊ इच्छिणारे कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी त्यांच्या राज्यात किंवा मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता निश्चित कार्यपद्धती अवलंबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याकरिता शासनाने जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे.
 यामध्ये सध्या विविध कॅम्पमध्ये जे मजूर आहेत त्यांच्याबाबतीत ते ज्या राज्यातील निवासी आहेत अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांना मजूरांच्या यादीसह संपर्क साधून त्यांची सहमती घेण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून सहमती मिळल्यानंतर या मजुरांना वाहनाद्वारे त्यांच्या
मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
इतर राज्यातील ज्या व्यक्ती रायगड जिल्ह्यात अडकून पडल्या असतील व ते त्यांच्या मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जाऊ इच्छित असतील, अशा व्यक्तींनी प्रवास करणार्‍या व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करून रायगड जिल्ह्यातील रायगड इ-पास या अ‍ॅपवर अर्ज करावा. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून बाहेर राज्यामध्ये जाणारे  कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5 या लिंकवर माहितीही भरावी.
रायगड जिल्ह्यातून बाहेर राज्यात जाणारे  कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी वाहतूक-प्रवास करण्यासाठी वरील गुगल लिंकमध्ये माहिती भरल्यानंतर तसेच रायगड इ-पास या अ‍ॅपद्वारे अर्ज केल्यानंतर परराज्यात जाऊ इच्छिणार्‍यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून 3 मेासून परवानगी देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये परराज्यातील जे मजूर अथवा व्यक्ती अडकल्या आहेत, अशा व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply