Sunday , September 24 2023

सट्टाबाजाराचा भाजपला कौल

एनडीए सरकार पुन्हा स्थापन होण्याचा अंदाज

जोधपूर : वृत्तसंस्था

राजस्थानमधील जोधपूरजवळच्या फालोदी येथील सट्टाबाजाराने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला आहे. एनडीए केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करेल, असा या सट्टाबाजाराचा दावा आहे.

निवडणुकीआधी विविध सर्वेक्षण चाचण्यांमधून कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला जातो. त्याचप्रमाणे सट्टाबाजारसुद्धा आपला अंदाज वर्तवत असतो. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 250पेक्षा जास्त जागा मिळतील, तसेच एनडीएला 300 ते 310च्या दरम्यान जागा मिळतील. राजस्थानमध्ये भाजपला 25 पैकी 18 ते 20 जागा मिळतील, असेही सट्टाबाजाराचे भाकीत आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमुळे भारतीय मतदारांची भावना बदलली आहे, असा सट्टाबाजाराचा निष्कर्ष आहे. एअर स्ट्राइक होण्याआधी फालोदीमधील बुकींनी एनडीएला 280 आणि भाजपला 200च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता, पण एअर स्ट्राइकनंतर मतदारांची भावना बदलल्यामुळे भाजप आणि पर्यायाने एनडीएच्या जागा वाढतील, असे बुकींचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, सट्टाबाजाराने काँग्रेसच्या जागा कमी केल्या आहेत. आधी काँग्रेस 100च्या आसपास जागा जिंकेल, असे बुकींनी म्हटले होते, मात्र आता काँग्रेसला 72 ते 74 जागाच मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply