पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 15) महापालिका क्षेत्रात 15 आणि ग्रामीणमध्ये 12 असे मिळून 27 नवे रुग्ण आढळले. आता महापालिका क्षेत्रात 234 रुग्ण झाले असून, तालुक्यात 324 रुग्ण आहेत, तर जिल्ह्यातील एकूण आकडा 459 झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी संकल्प सोसायटीत एकाच घरातील दोन आहेत. कामोठ्यातील रुग्णांत पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या नातेवाईकांचा समावेश आहे. एक बँक ऑफ इंडियाच्या माजगाव शाखेतील लिपिक आहे. कळंबोलीतील एक रुग्ण धारावीतून पाहुणा आला होता, तर एका महिलेला पतीपासून संसर्ग झाला आहे. खारघरमधील तीन रुग्ण हे मुंबईशी संबंधित आहेत. खांदा कॉलनीतील एक रुग्ण मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला असून, या पोलीस ठाण्यातील हा दुसरा रुग्ण असल्याने पोलीस ठाणे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
पनवेल ग्रामीणमध्ये 12 नवीन रुग्ण आढळले असून, त्यापैकी पाली देवद (सुकापूर) आणि करंजाडे येथील एकाच घरातील प्रत्येकी चार रुग्ण आहेत. एक रुग्ण उलवे येथील आहे. ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या 93 झाली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …