Sunday , September 24 2023

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

अलिबाग : जिमाका : लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाली आहे. ही निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडतानाच आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर  भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणूक 2019च्या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रायगड लोकसभा मतदारसंघात तिसर्‍या टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला आदी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांनाही निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भात माहिती देण्यात आली.

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर करावयाची कार्यवाही 

शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर : सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स किंवा कटआऊट, होर्डिंग, बॅनर, झेंडे इत्यादी आणि सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बसेस, इलेक्ट्रीक, टेलिफोन खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून 48 तासांत काढून टाकण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी.

खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण : खासगी संपत्तीवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून 72 तासांमध्ये काढून टाकाव्यात.

सार्वजनिक निधीच्या खर्चांवर जाहिरात : निवडणूक जाहीर झाल्यानंतर सार्वजनिक निधीच्या खर्चांवर जाहिरात करण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या जाहिराती तत्काळ बंद करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

शासकीय संकेतस्थळावरील राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो : निवडणुका जाहीर होताच शासकीय संकेतस्थळावरून राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो तत्काळ काढून टाकण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात.

विकास, बांधकाम क्षेत्रातील गतिविधी : निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांमध्ये जिल्ह्यातील खालील बाबतीत आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारी मान्य करण्यासाठी यादी प्राप्त करून घेणे. प्रत्यक्ष कामाची, सुरुवात झालेल्या कामांची यादी, प्रत्यक्ष कामाची सुरुवात न झालेल्या कामांची यादी तयार करणे.

निवडणूक खर्च देखरेख आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतची कार्यवाही : फ्लाईंग स्क्वॉड, ऋडढ, ळवशे ढशरा, दारू, रोकडे, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकीसंदर्भात फ्लाईंग स्क्वॉड इत्यादी तत्काळ कार्यान्वित करण्यात आली.

तक्रार देखरेख यंत्रणा : निवडणुका जाहीर होताक्षणी अधिकृत संकेतस्थळांसह खढ -रिश्रिळलरींळेपी आणि सोशल मीडिया तत्काळ तक्रार देखरेख यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

मतदार व राजकीय पक्षांच्या जागृतीसाठी माहितीचे प्रसारण करणे : निवडणूकविषयक प्रमुख घडामोडींची जाहिरात करण्यात यावी. रेडिओ, टीव्ही, दूरचित्रवाणी, सिनेमागृहे, शासकीय वाहिन्या यांवरून मतदार शिक्षण सामुग्रीचे प्रसारण करण्यात यावे.

शैक्षणिक व खासगी संस्थाकडून सक्रिय सहकार्य : निवडणूकविषयक माहिती सर्वसामान्य नागरिक व सर्व संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक व खासगी संस्थाकडून सक्रिय सहकार्य घेण्यात यावे.

माध्यम केंद्र : मतदार, राजकीय पक्ष व सर्व संबंधितांमध्ये एतच/ततझ-ढसह निवडणूक यंत्रणेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी माध्यम केंद्राचा उपयोग करण्यात यावा.

चउचउ/ऊएचउ : राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्या अनुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

नियंत्रण कक्ष : जिल्हा स्तरावर 24द7 कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा व त्यासाठी पुरेशा प्रमाणात मुनष्यबळ आणि अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे.

जिल्ह्यातील निवडणूक शांततेच्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी तसेच मतदारांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

-डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.

रायगड लोकसभा निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द       : 28 मार्च

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची मुदत  : 4 एप्रिल

नामनिर्देशन पत्राची छाननी             : 5 एप्रिल

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत      : 8 एप्रिल

मतदान                              : 23 एप्रिल

मतमोजणी                            : 23 मे

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply