पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक मदत आणि उपक्रम सध्या राबविले जात आहे. राज्यातले आदिवासी हे महाराष्ट्राच्या जनतेचा अविभाज्य भाग आहेत. आदिवासी भागातील लोक डोंगरावरती राहत असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास त्रास सहन करावा लागतो. म्हणून नेक्स्ट व्हेंचर यांच्या सहकार्याने पनवेलमधील आदिवासी गरजू कुटुंबियांना किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
या वेळी विशाल मालगावकर, धनंजय देसाई, हेमंत जाधव, संदीप मोक्षी, संदीप सावंत, अमित गुरव, संतोष दगडे आणि त्याच बरोबर आयफ्लेक्स टेचनोलॉगिसचे डायरेक्टर रणजित नरुटे व त्यांचे सहकारी दिनेश परब आदी उपस्थित होते.
फेस शिल्ड वाटप करतना समीर अत्तार, दिनेश परब, विक्रम नरुटे, विशाल मालगावकर, सुरज जाधव, राहुल डोंबाळे हे देखील होते त्याचबरोबर आदिवासी लोकांना कोरोनाबद्दल माहिती देण्यात आली. व प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन केले.