रोहे : प्रतिनिधी – कोरोना अनुषंगाने खबरदारी, नागरिकांच्या सूचना आणि उपाययोजनांसंदर्भात रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांची संयुक्त बैठक शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत विविध विषायांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, सभापती, गटनेते, नगरसेवक, व्यापारी प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.
या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेच्या वेळा, आंबा व भाजी विक्रेते यांचे बसण्याचे नियोजन, बाहेरील येणार्या गाड्यांची तपासणी, शहरासाठी रुग्णवाहिका उपलब्धता आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या बैठकीत नागरिकांनी अनेक सूचना मांडल्या.