Breaking News

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे -अॅड. महेश मोहिते

मुरुड : प्रतिनिधी – मुरुडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी प्रत्यक्ष मुरुड तहसीलदार गमन गावीत व आरोग्य विभागाशी चर्चा करताना केले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, शासकीय यंत्रणेने सतर्क राहून या विषाणूचा प्रसार रोखला पाहिजे. यासाठी जनजागृती व संचारबंदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. गावा गावाने सतर्कता राखून मुंबई पुणे येथून येणार्‍या लोकांची नोंद व तपासणी करून शासकीय यंत्रणेस सहकार्य केले पाहिजे.

मुरुड तालुक्याचा आरोग्य प्रश्न ऐरणीवर आला असून यामध्ये सुधारणा होण्यासाठी अ‍ॅड. महेश मोहिते यांनी रविवारी तहसीलदार गमन गावीत यांची कार्यालयात भेट घेतली व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर यांच्याशी सुद्धा चर्चा केली.

तसेच मोहिते यांनी कोविड सेंटर ला भेट दिली तेथील कोविड योध्यांचे आभार मानले. शासकीय विश्राम गृह येथील क्वारंटाइन सेंटरला भेट दिली. तेथील डॉक्टरांशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला. या परिस्थिती भाजप आपल्या सोबत असून सर्वोतोपरी साहाय्य करण्याची तयारी दर्शवत त्यांचे मनोबल मोहिते यांनी वाढवले. त्याचबरोबर डॉक्टर नर्स यांच्यासाठीच्या पीपी किट मास्क, ग्लोज, उपलब्धता पाहिली, डॉक्टर नर्स यांची असणारी राहण्याची व्यवस्था तातडीने एमटीडीसीच्या गोल्डन स्वानमध्ये करावी अशी सूचना अ‍ॅड. मोहिते यांनी केली. उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर येथे डॉक्टर नर्स यांच्यासाठी वेगळे वॉशरूम आणि बेसिन व्यवस्था करावी, अशी विनंती बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलताना केली.

 या वेळी मुरूड तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर मुरुड शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, नारेशजी वारगे, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply