नावडे परिसरात हळहळ व्यक्त
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अविनाश लक्ष्मणशेठ म्हात्रे (नावडे, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ यांचे 5 ऑगस्ट रोजी, तर आईचे 18 जुलै रोजी निधन झाले होते. या आघातामुळे त्यांच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अविनाश म्हात्रे यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, आर. सी. घरत, नारायणशेठ ठाकूर, प्रवीण ठाकूर, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नितीन पाटील, अभिमन्यू पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, अरविंद म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा नेते दशरथ म्हात्रे, प्रकाश खैरे, प्रमोद भिंगारकर, दिनेश खानावकर आदी उपस्थित होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कै. अविनाश म्हात्रे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. काही दिवसांच्या अंतराने वडील, आई आणि मुलगा यांचे निधन झाल्याने नावडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.