Sunday , September 24 2023

व्यापारी राजेंद्र मोदी यांचा अपघाती मृत्यू

नागोठणे : प्रतिनिधी

येथील व्यापारी राजेंद्र लालचंद मोदी (वय 54) यांचा मंगळवारी (दि. 26) सकाळी अपघाती मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिरावयास जातो, असे सांगून मोदी दुकानातून मार्गस्थ झाले होते. बराच वेळ जाऊनही ते परतले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर घरातील माणसांनी रात्रभर त्यांचा परिसरात शोध घेऊनही ते आढळले नव्हते. मंगळवारी सकाळी एक व्यक्ती नदीवर जात असताना  मोदी मृतावस्थेत पडले असल्याचे आढळून आले होते. निदर्शनास आलेली बाब त्यांनी तातडीने मोदी यांच्या घरी कळविल्यानंतर पोलिसांना पाचारण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. पोलीससूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक अंदाजात, अंबा नदीकिनारी स्मशानभूमीची भिंत बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात आला असून, या खड्ड्यात पडून मान तुटल्याने राजेंद्र मोदी यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राजेंद्र मोदी यांच्या पार्थिवावर दुपारनंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र, सून, एक कन्या असा परिवार असून अकाली मृत्यूनिमित्त संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply