Breaking News

भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर

विचुंबेत प्रचार रॅली; नागरिकांचा प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची होत असून विचुंबे ग्रामपंचायतीमधील विकासाची गाडी आणखी वेगाने धावण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे 5 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या सूत्राला मतदान करून भाजप महायुतीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर यांच्यासह सदस्यांना विजयी करा, असे आवाहन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर रविवारी (दि. 29) प्रचारादरम्यान केले, तर या वेळी प्रमोद भिंगारकर यांनी विचुंबे ग्रामपंचायत टँकरमुक्त करू, अशी ग्वाही दिली.
पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. विचुंबे येथील निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाइं महायुतीच्या थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर तसेच सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून निकिता म्हात्रे, श्याम म्हात्रे, संदीप पाटील; प्रभाग 2मधून ज्योती भोईर, कंकेश गोंधळी, प्रितेश भिंगारकर; प्रभाग 3मधून श्रावणी भोईर, प्रगती गोंधळी, अनिल भोईर; प्रभाग 4मधून विभुती सुरते, आरती गायकवाड, नितीन भोईर आणि प्रभाग 5मधून भाग्यश्री भोईर, भावना साधू, अनंता गायकवाड उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रल्हाद केणी, एस.के.नाईक, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच किशोर सुरते, अप्पा भागीत, के.सी.पाटील, नितीन भोईर, डी.के.भोईर, विवेक भोईर, नयन भोईर, राम म्हात्रे, महेश भिंगारकर, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, जयवंत भिंगारकर, प्रल्हाद भोईर, आनंद गोंधळी, जगदीश भोईर, प्रेम भिंगारकर, हरेश जळे, महेंद्र म्हात्रे, संदीप भिंगारकर, चेतन भिंगारकर, अमिता म्हात्रे, अक्षता गायकवाड, संगीता भोईर, नवीता भोईर, सुनीता भोईर, मानसी भोईर, सोनम म्हात्रे, हर्षदा भिंगारकर, प्रतिभा म्हात्रे, शर्मिला जाधव, बनाकाकू म्हात्रे, स्वाती सुरते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply