Breaking News

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांना अडथळा

खोपोली : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त फटका महावितरणला बसला आहे. अथक परिश्रमानंतर खोपोली व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला खरा, मात्र त्यानंतरही वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण आहेत. याचा सर्वांत मोठा फटका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरून ऑनलाइन काम करीत असलेले नोकरदार आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बसत आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे एक आठवडा खापोलीतील वीजपुरवठा बंद होता. महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत केला. याकामी स्थानिक स्तरावर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली. या कामगिरीचे नागरिकांनी तोंडभरून कौतुकही केले, मात्र त्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याची स्थिती आहे. खोपोली व परिसरात दिवसा व रात्री कधीही वीज खंडित होते. वीज नसल्याने
इंटरनेटही बंद पडते. वारंवार वीज जात असल्याने लहान-मोठे व्यावसायिक तसेच वर्क फ्रॉम होम करणारे नोकरदार आणि ऑनलाइन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे.  

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply