Breaking News

अक्रित झो संगमेश्वरी बोलीतील वेबसीरिज

रसिकांना दर आठवड्याला भेटण्यासाठी संगमेश्वरी बोलीतून ‘अक्रित झो.. मरनाच्या भायेर बेफाट’ ही वेबसीरिज लवकरच अपलोड केली जाणार आहे. या सीरिजच्या शीर्षक व शीर्षक गीताचे अनावरण नुकतेच करण्यात आले. 29 सप्टेंबरला वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे कथालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगाव सरपंच वैशाली गावडे-सनगरे यांच्या हस्ते या वेबसीरिज शीर्षकाचे अनावरण, तर नाट्य परिषद रत्नागिरी शाखा कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी शीर्षक गीताचे अनावरण केले.

रत्नागिरी जिल्ह्यात बोलल्या जाणार्‍या संगमेश्वरी बोलीचा आनंद आता वेबसीरिजच्या माध्यमातून घेता येणार आहे. ‘अक्रित झो.. मरनाच्या भायेर बेफाट’ ही संगमेश्वरी बोलीतील पहिली वेबसीरिज लवकरच भेटीला येत आहे. या सीरिजचे शीर्षक आणि शीर्षक गीताचे अनावरण 1 सप्टेंबरला रत्नागिरीत झाले. गेल्या तीन वर्षांत 200 प्रयोगांचा पल्ला गाठून रसिकप्रिय झालेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याच्या टीमतर्फे ही वेबसीरिज सादर केली जाणार आहे.

29 सप्टेंबरला वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. ती दर आठवड्याला प्रसारित होणार आहे. रत्नागिरीतील हॉटेल सी फॅन्स येथे झालेल्या या सोहळ्यात ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे कथालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगावच्या सरपंच वैशाली गावडे-सनगरे यांच्या हस्ते या वेबसीरिजच्या शीर्षकाचे अनावरण झाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी शीर्षक गीताचे अनावरण केले. या वेळी नाचणे गावाचे माजी सरपंच संतोष सावंत, आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर श्री. लुईस, उद्योजक दिनेश सावंत, कौस्तुभ सावंत, बांधकाम व्यावसायिक वीरेंद्र वणजू, जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, तसेच नाट्य क्षेत्रातील विजय साळवी, भाग्येश खरे, अण्णा वायंगणकर, सतीश दळी, डॉ. शशांक पाटील, शेखर जोशी, अप्पा रणभिसे, दीपक सनगरे आदी उपस्थित होते.

कोकणी माणूस फणसासारखा काटेरी असला तरी आतून गोड असतो. गावाच्या सर्व गोष्टींची त्याला माहिती असते. त्याचा हा खास कोकणी स्वभाव मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवून या वेबसीरिजमधून प्रबोधन करण्यात येणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती रत्नागिरीतील समर्थ कृपा प्रॉडक्शनने केली आहे.

कथा-पटकथा अनिल दांडेकर यांची असून, क्रिएटिव्ह हेड सिद्धेश बंदरकर, सचिन काळे हे आहेत. संगीत गणेश घाणेकर यांचे आहे. ध्वनियोजना सुरेंद्र गुडेकर, आराध्या साऊंड यांची असून, प्रकाशयोजना संतोष सनगरे, अनिकेत गानू यांची आहे. मेकअपची जबाबदारी नरेश पांचाळ यांनी सांभाळली असून, चित्रीकरण साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले यांनी केले आहे. संकलन निखिल पाडावे यांचे असून, प्रॉडक्शन टीममध्ये मंगेश मोरे, पिंट्या चव्हाण, मंगेश चव्हाण, श्रेयस मुळे यांचा समावेश आहे.

या वेबसीरिजला चवे, रानपाट, पोचरी ग्रामस्थांचे विशेष साह्य लाभले आहे. सुनील बेंडखळे, सचिन काळे, प्रभाकर डाऊल, अक्षता कांबळी, विश्वास सनगरे, मनाली मिराशी, रवींद्र गोनबरे, अनिकेत गोनबरे, हनुमान गोनबरे,

आदेश मालप, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, केतन शिंदे, राज शिंदे हे कलाकार या वेबसीरिजमध्ये आहेत.

-योगेश बांडागळे (मो. क्र. 9923428838)

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply