Breaking News

सोशल मीडियावर कमांड ठेवा

प्रदेश भाजप सहसंयोजक समीर गुरव यांचे आवाहन

उरण : रामप्रहर वृत्त

आज सोशल मीडियात ज्या ज्या माध्यमांचा वापर प्रभावीपणे होतो त्या सर्वांवर चांगली कमांड ठेवून अभ्यासपूर्वक व अचूकपणे त्यांचा वापर करा. राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचला, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक समीर गुरव यांनी शनिवारी (दि. 17) केले. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

उरण विधानसभा मतदारसंघ भाजप सोशल मीडिया अभ्यासवर्गाचे आयोजन शनिवारी द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, कोकण विभाग सहसंयोजक अभिजीत पेडणेकर, जिल्हा संयोजक विशाल शिंदे, सहसंयोजक विलास श्रीखंडे, उरण विधानसभा संयोजक प्रसाद मांडेलकर, कर्जत तालुका अध्यक्ष संतोष ऐनकर, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, चिटणीस चंद्रकांत घरत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर तांडेल, सरचिटणीस तेजस पाटील, समीर मढवी, दीपक भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एकसंध व्हा! : महेश बालदी

भाजप नेते महेश बालदी आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्याला उरण विधानसभा भाजपमय करण्यासाठी सर्वतोपरी व सक्षम प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आपल्या कामात कुठेही कमतरता न ठेवता एकसंधपणे लक्ष घाला. भाजपचा विजयी ध्वज कोणीही रोखू शकणार नाही.

सोशल मीडियाच्या कामातील तांत्रिक अडचणी व त्यावरील उपाययोजना सोडवण्यासाठी आम्ही सदैव आपल्याबरोबर आहोत. जेव्हा गरज असेल तेव्हा वरिष्ठांचा सल्ला घ्या.

-अभिजीत पेडणेकर,  सहसंयोजक, भाजप सोशल  मीडियाचा कोकण विभाग

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply