Breaking News

कर्जत पोलिसांनी केली कोरोनावर मात; सहकार्‍यांकडून जंगी स्वागत

कर्जत ः बातमीदार                                      

कर्जत पोलीस ठाणे येथील तीन पोलिसांनी कोरोनाला हरवून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. एका कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तिघे पोलीस कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत.

सावळे गावातील आरोपी कोठडीत असताना त्यातील एका आरोपीस कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आरोपीच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक शरद देठे तसेच पोलीस शिपाई सुरेश पालोदे आणि मारुती मंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे अधिकारी-कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना प्रथम पोलीस शिपाई मारुती मंदे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मरोळ, मुंबई येथील कोविड केअर सेंटर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांनतर दोन दिवसांनी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व सुरेश पालोदे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. म्हणून त्यांनाही मरोळ, मुंबई येथील कोविड सेंटर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मरोळ येथे उपचार घेऊन पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी कोरोनावर मात करून शनिवारी सायंकाळी कर्जत पोलीस ठाणे येथे हजर झाले. त्यांचे रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी अभिनंदन केले असून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले. दहिवली व हालीवली ज्ञानदीप सोसायटी येथे राहणारे आणखी दोन पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह असून तेही कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेरळ पोलीस ठाणे येथे सेवेत असलेले पोलीस उपनिरीक्षक व मूळच्या अवसरे गावातील असलेल्या परंतु सध्या ठाणे येथे सेवेत असलेल्या महिला पोलीस यादेखील कोरोनाशी दोन हात करीत असून ते सर्व कोरोनाला हरवून पुन्हा सेवेत कायम राहतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply